शहराच्या पूर्वेला असल्येल्या टेकडीवर खंडेश्वरी माता विसावलेली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती संपूर्ण महाराष्टर मध्ये आहे.
संपूर्ण मंदिराचा परिसर सुमारे दहा एकरांचा आहे. पाचशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी हे मंदिर बांधले आहे. ट्रस्ट व भाविकांच्या श्रद्धेतून खंडेश्वरीदेवीला आजपर्यंत 34 तोळ्यांचे 21 सुवर्णालंकार व 20 किलोचे चांदीचे दागिने अर्पण करण्यात आलेले आहेत. माहुरवासिनी रेणुकामाता सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरून बीडमध्ये आली आहे असे भक्त सांगतात.
नवरात्रोत्सवानिमित्त यात्रा :
दसरा जवळ आला की बीडकरांना वेध लागतात ते म्हणजे खंडेश्वरी माता नवरात्रोत्सवाचे. नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. दरवर्षी भाविकांची आलोट गर्दी येथे पाहावयास मिळते. यात्रेनिमित्त या ठिकाणी मोठमोठे रहाटपाळणे आणि वेगवेगळे खेळण्याचे स्टॉल्स लागलेले असतात आणि याचा आनंद संपूर्ण जिल्यातील नागरिक घेतत्.
भाविक नऊ दिवस उपवास करुन देवीची आराधना करतात. काही भाविक या नऊ दिवसांरिक खंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होतात. या नऊ दिवसांत या भागात मोठी गर्दी असते. त्यामुळे या भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला असतो.
खंडोबा मंदिर:
देवीच्या मंदिरासमोरच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले खंडोबा मंदिर आहे. आजही जिल्ह्यात शेकडो वर्षे जुनी हेमाडपंथी मंदिरे आहेत. पूर्वेकडील टेकड्यांवर वसलेले खंडोबा मंदिर हे त्यापैकी एक. तीनशे वर्षाहून अधिक इतिहास असणारे खंडोबा मंदिर आणि त्याच्या दिपमाळीचे महत्व अधिक आहे.
येथील खंडोबा मंदिराच्या समोरील बाजूस भव्य अशी सत्तर फुटी दीपमाळ आहे. ही दिपमाळ महाराष्ट्रात सर्वात उंच असल्याचे जाणकार सांगतात. वीट आणि चुन्याचा वापर करुन ही भव्य दिपमाळ उभारण्यात आली होती. जवळपास 300 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही दिपमाळ आजही तटस्थपणे इतिहासाची साक्ष देत उभी आहे.
कसे पोहोचाल?:
रस्त्याने
कोणत्याही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरून नियमित राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत.
बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 211 आणि 222 जातो.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन परळी येथे आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 92 किमी अंतरावर आहे.
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद जिल्ह्यात आहे जे जिल्हा मुख्यालयापासून 128 किमी अंतरावर आहे.